Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

कधी

May 03, 2017

Search by Tags:  कविता

कधी

कधी अकाशात उंच
पाखरे येती
मनास माझ्या दूरवर
घेऊनी जाती


कधी काजळी
येता दिव्याला
कसे आवरावे
रूसल्या ज्योतीला


कधी सांजवेळी
पडतो सडा पानांचा
विस्कटले सारे परी
लोभस डाव जीवाचा


कधी असे वाटते
येता तू घरी
चंद्र चांदण्यांच्या
कोसळता सरी

Search by Tags:  कविता
Top

Ganesh Yeshi's Blog

Blog Stats
  • 1204 hits