Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

प्रेमाच बेट

May 12, 2017

Search by Tags:  कविता

प्रेमाच बेट


आज खूप वेगळ वाटतंय

प्रेमाच्या ओघात खूप दूर दूर आलोय


इथ प्रेमच प्रेम आहे

मानस मला जपता

झाड माझ्यावर प्रेम करता

आकाशातून जिव्हाळ्याचे थेंब बरसता


इथ कोणी रडत नसत

सगळ्यांच्या मनात हासू असत


सार सार नैसर्गिक

देवान बनवल्यासारख


भास होतात किमी चाललोय प्रेमाच्या बोटीवर

काम, व्यवहार,दुनियादारी

राहिल्या दूर किनाऱ्यावर


देवान दिलेलं हे फुल

किती जपून ठेऊ

जपून ठेवायला काहीच तर दिल नाही

कस जपून ठेऊ


हूर हूर लागते

परत आल्यावर जगता येईल का

परत इकड कोणी घेऊन येईल का

Search by Tags:  कविता
Top

Ganesh Yeshi's Blog

Blog Stats
  • 1125 hits