Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मन माझ आणि निसर्ग तू..............

May 18, 2017

Search by Tags:  कविता


मन माझ आणि निसर्ग तू..............


चंद्र झाल्या भावना

बिलगुनी माझ्या मना

जे अस्ताच्या पलीकडे

ते छंद माझ्या कडे


मी नसतो कधी जुना

झालो मी सुमने पहा

जेथे जीव तुझा जडे

ते बंध आहे माझ्याकडे


दिशा का लाजती उगा

चढऊनी थाट नवा

जेथे रंग तुझा उडे

ते जग आहे माझे बरे


चांदणी लेऊ दे घना

पाऊस दे थोडा मना

जे अर्थ तुझे पडे

ते जपले मोती माझ्या कडे

Search by Tags:  कविता
Top

Ganesh Yeshi's Blog

Blog Stats
  • 1056 hits