Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

एकटा चाल ,एकटा चाल

May 15, 2017

Search by Tags:  कविता

एकटा चाल एकटा चाल
एकटा चाल, एकटा चाल

वाटत जवळ असत कोणी

नाही म्हणण्याच्या पलीकडे

स्वप्न आपली विचार आपले

वाचून त्यांच्या माझे का अडे


एकटा चाल, एकटा चाल

प्रेम माझे दुख माझे विरह हि माझाच

शिवाय त्यांच्या सगळे झाले माझे अप्त

मोहात पडताना सगळे मी आणि माझे

सत्यात सगळे होऊन जातात लुप्त


एकटा चाल, एकटा चाल

अचानक माझे सगे ते नसून मी वाटता

त्याचं जग ते होऊन जात माझ जग

परमार्थ नाही याला वासना किंवा प्रेम म्हणाव

म्हणजे ते मुर्खा सारखे दूर दूर का जाता मग


एकटा चाल, एकटा चाल

प्रेमाच्या नादात आहेस कुठ तू स्वतंत्र

शिवाय त्यांच्या आहे का तुला अस्तित्व

गुलाम नसलो तरी त्यांचाच आहे मी

जोडलेलं प्रेमाच रक्त आणि कामापुरत महत्त्व

Search by Tags:  कविता
Top

Ganesh Yeshi's Blog

Blog Stats
  • 1954 hits